श्री क्षेत्र सावळेद्वार ( सावळदबारा )
***********************
ता.सोयगाव जि.औरंगाबाद
नमस्कार मित्रांनो,
आम्ही भटकंती सह्याद्री समूहाच्या माध्यमातून आपल्या परिसरातील प्रेक्षणीय,धार्मिक, ऐतिहासिक,नैसर्गिक पर्यटन स्थळांची माहिती सर्वांना सहज प्राप्त व्हावी व त्यासोबतच ह्या ठिकाणचे महत्व देखील सर्वांना सहज माहिती व्हावे ह्या उद्देशाने हा व्हिडिओ आपल्यासमोर सादर करीत आहोत आम्हाला आपल्या सहकार्याची अपेक्षा आहे आपण आम्हला आपल्या परिसरातील प्रेक्षणीय स्थळांची माहिती नक्की द्यावी.🙏🙏🙏
___________________________________________
आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा आणि आपल्या नातेवाईक व मित्र परिवाराला सुद्धा सबस्क्राइब करायला सांगा.
व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक व शेअर करा
!!धन्यवाद!!
___________________________________________
बुलढाणा येथून काही किलोमीटर अंतरावर जालना जिल्ह्याच्या उत्तर टोकावर महानुभाव पंथाचे पावन स्थान श्रीक्षेत्र जाळीचा देव तीर्थक्षेत्र आहे.
जाळीचा देव हे एक निसर्गरम्य ठिकाण आहे. अगदी डोंगराच्या माथ्यावर हे मंदिर असल्याने भाविकांची पावले लवकर परतीच्या मार्गावर लागत नाही. मंदिराच्या मागील बाजूने खोल दरी आहे. येथून डोंगर माथ्याचे विहंगम दृश्य पाहायला मिळते. त्यामुळे बराचवेळ भक्त येथे रममाण होतात. येथून खाली पायऱ्यांच्या वाटेने आपण श्री क्षेत्र सावळदबारा येथे जाऊ शकतो.
आख्यायिका -
_____________
महाराष्ट्र भ्रमण करीत असतांना सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामीं पूर्वार्ध काळात चांगदेव वरून सावळेद्वारला येत होते. त्याच्या आधल्या दिवशी बाइसांनी मार्कांडाला समोर पाठविले व त्याच्याजवळ सावळेद्वारला आपला भाचा दायनायकाला स्वामीं सावळेद्वारला येत आहेत असा निरोप पाठवला. दायनायक स्वागताची तयारी करून स्वामींसाठी घोडा घेवुन आले. स्वामीं घोड्यावर बसले, पाठीमागे भक्त चालत होते. देमाइसाला थकलेले बघुन स्वामींनी तिला घोड्यावर बसण्यास सांगितले. मात्र तिने आपला हात घोड्याच्या पाठीवर ठेवला आणि म्हणाली "स्वामीं ! मी घोड्यावर बसल्यासारखीच आहे" असे म्हणून पुन्हा पायी चालु लागली. तिची ही नम्रता बघून मग स्वामींनी भगवान श्रीकृष्ण व उध्दवदेव कुब्जिकेच्या घरी गेले तिथली उध्दवदेवांच्या नम्रपणाची गोष्ट सांगितली. तो पर्यंत स्वामी गावात पोहचले. दायनायकाच्या घरी स्वामींचा पुजावसर झाला, भोजन झाले, निद्रा झाली.
स्वामींचे सावळेद्वार येथील गुंफेत वीस दिवस वास्तव्य होते. येथुन नंतर स्वामी जाळीचा देव वरून वालसावंगीला गेले.
अशी ह्या स्थाना बद्दलची अख्यायिका आहे
सावळदबारा येथे आपल्याला स्वामींचे आरोगणा स्थान,उजवी सोंडी आसन स्थान.डावी सोंडी आसन स्थान,मर्दना मादने स्थान,निशेपण स्थान,लघु परिश्रय स्थान,दीर्घ परिश्रय स्थान,पूजा आरोगणा स्थान,विहरण स्थान पाहायला मिळतात
सावळदबारा येथे महानुभाव पंथाच्या संस्थानात राहण्याची व जेवणाची व्यवस्था होऊ शकते.
पोहचण्याचा मार्ग:-
___________________
औरंगाबाद वरून सिल्लोड शिवणा धावडा जाळीचा देव गिर्दा मार्गे सावळदबारा १४० किमी
तर जळगाव येथून नेरी जामनेर,फत्तेपूर मार्गे सावळदबारा ८५ किलोमिटर
आणि बुलडाणा येथून पाडळी मार्गे गिर्डा घाटातून सावळदबारा ३२ किलोमिटर अंतरावर आहे
फत्तेपूर ह्या ठिकाणाहून बस व पर्यायी व्यवस्था होऊ शकते मात्र ह्या ठिकाणी येण्यासाठी जाळीचा देव हे सर्वात सोयीचे ठिकाण असून पायऱ्यांच्या मार्ग हा सर्वात सोपा पर्याय आहे
*****************************************
🌹🍀☘️☘️☘️🍃🍃☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️
___________________________________________
Please Like Share and Subscribe Channel
#भटकंतीसह्याद्रीसमूह
@Bhatkanti_Sahyadri_Samuh
#Bhatkanti_Sahyadri_Samuh
____________________________________________
महत्त्वपूर्ण माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमचे "भ्रमण महाराष्ट्राचे" हे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा.
!!धन्यवाद!!
https://youtube.com/channel/UCwo0mORS1t6NvVQitWsywRw
#भ्रमण_महाराष्ट्राचे @Bhraman_Maharashtrache
___________________________________________
Shoot by:-
DJI OSMO Action
--------------------------------------------------------------------
Follow:-
Facebook:-https://www.facebook.com/wanderingSahyadri
Instagram:-
https://www.instagram.com/nskharate
__________________________________________
Music by video:-
SBM
https://youtube.com/@SBMNoCopyrightMusic
NCV
https://youtube.com/@NO_COPYRIGHT_VIBES
___________________________________________
#Mahanubhav #स्थानदर्शन
#Jalichadev #जालना #बुलडाणा #चक्रधरस्वामी #महानुभाव #निसर्गरम्य #hillstation
#जाळीचादेव #bhokardan #jalna #buldana
-------------------------------------------------------------------
============Thank You=============