Mysore Infosys Layoff: 400 ट्रेनी कर्मचाऱ्यांना Infosys ने म्हैसूरमध्ये नारळ दिला, नेमकं काय घडलं ?
#BolBhidu #MysoreInfosysLayoff #Infosys
90 च्या दशकात शिक्षण घेणाऱ्या तरुणांचा कल हा इंजिनिअरिंग करण्याकडे जास्त होता. कारण त्यावेळीच्या तरुणांसाठी इंजिनिअरिंगची व्याख्या ही बक्कळ पैशाची नोकरी आणि पॉश लाईफ ही होती. त्यानंतर 2000 सालापासून याच बक्कळ पैसा मिळवून देणाऱ्या नोकरीची जागा आयटी क्षेत्राने घेतली होती. आयटी, इन्फोर्मेशन टेक्नोलजी याच आयटी कंपन्यांमध्ये मोठमोठ्या पॅकेजची नोकरी मिळवण्यासाठी तरुण-तरुणी मोठा शैक्षणिक खर्च करुन नामांकित आयटी कंपन्यांमध्ये जॉब मिळवण्यासाठी ट्राय करत असतात त्यासाठी गरज पडल्यास कन्सलटंटी पण जॉईन करतात. आणि एवढं सगळं करुन जेव्हा आयटी कंपनीत जॉब लागतो तेव्हा कुछं हे तरुण टेन्शन फ्री होतात. पण पुढे अचानक एखाद्या दिवशी तीच आयटी कंपनी मोठा ले ऑफ करते.
सध्या अशाच एका ले ऑफची चर्चा सगळीकडे सुरु आहे. नारायण मूर्ती यांच्या म्हैसूरमधील इन्फोसिस कंपनीने एकाचवेळी 400 ट्रेनी कर्मचाऱ्यांना कंपनीतून काढून टाकल्याची माहिती माध्यमांमधून समोर आली आहे. कंपनीने अचानक केलेल्या या ले ऑफमुळे अनेक ट्रेनी कर्मचारी मेंटली डिस्टर्ब झाल्याचं सांगितलं जातंय तर दुसरीकडे कंपनीने हा ले ऑफ ऑफिशीयली केला असल्याचं सांगितलंय. मात्र कंपनीतून काढून टाकलेल्या कर्मचाऱ्यांनी इन्फोसिस सारख्या नामांकित कंपनीवर गंभीर आरोप केले आहेत. त्यामुळे आता इन्फोसिस कंपनीने नक्की ले ऑफ का केला होता? या ले ऑफच्या नियमांबाबत ट्रेनी कर्मचाऱ्यांना कंपनीने पूर्वकल्पना दिली होती का? आणि कर्मचाऱ्यांनी कंपनीवर कोणते आरोप केले आहेत? हेच या व्हिडीओतून पाहुयात.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : https://www.facebook.com/BolBhiduCOM
➡️ Twitter : https://twitter.com/bolbhidu
➡️ Instagram : https://www.instagram.com/bolbhidu.com/
➡️Website: https://bolbhidu.com/