ओल्या हळदीचे फायदे आणि लोणचे.
एकदा या पद्धतीचे लोणचे नक्की करून बघा शंभर टक्के वर्षभर टिकणार
कच्ची हळद अर्थात ओली हळद औषधी गुणांचा खजिना आहे. हळद पावडरपेक्षा कच्ची हळद आरोग्यासाठी अधिक फायदेशीर आहे. साधारणतः हिवाळ्यामध्येच ओली हळद बाजारात विक्रीसाठी उपलब्ध होते. आयुर्वेदात कच्ची हळद सूज कमी करण्यास, सर्दीची समस्या दूर करण्यासाठी, पाचन प्रणाली सुधारण्यासाठी, रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी, रक्ताचे शुद्धीकरण आणि कर्करोगासारख्या आजारांविरुद्ध लढण्यास प्रभावी असल्याचे दिसून आले आहे
कच्च्या हळदीच्या सेवनाने रोगप्रतिकार शक्ती मजबूत होते. हळद सर्दी, पडसे, खोकला आणि ताप प्रतिबंधित करते. तसेच, हळदीत भरपूर प्रमाणात आढळणारे अँटीसेप्टिक आणि अँटीबॅक्टेरियल गुणधर्म शरीरातील बुरशीजन्य संक्रमण काढून टाकते
ओल्या हळदीच्या लोणच्यासाठी लागणारे साहित्य पुढील प्रमाणे आहे -
अर्धा किलो ओली हळद
पन्नास ग्राम अद्रक
लोणच्यासाठी लागणारे मसाले _
दोन मोठे चमचे पिवळी मोहरी
दोन मोठे चमचे काळी मोहरी
एक चमचा जिरे
एक चमचा धने
एक चमचा बडीशे
अर्धा चमचे काळीमिरी
दहा ते बारा लवंग
अर्धा चमचा मेथी
अर्धी वाटी गूळ
दोन चमचे लाल तिखट
चार चमचे मीठ
एक ते दोन चमचे आमचूर पावडर
हे सर्व मसाले थोडा वेळ भाजून घातातील जमतपणा निघून गेला पाहिजे त्यानंतर अर्धा वाटी मध्ये हे सर्व मसाले बारीक करून मिक्स करा व किसलेली हळद आणि अद्रक त्यामध्ये मिक्स करून हे जे तयार झालेले मिश्रण आहे ते उन्हामध्ये दोन दिवस ठेवा त्याच्यानंतर एका भरणी मध्ये तुम्ही काढून ठेवा व हे लोणचे खाण्यासाठी तयार आहेत
हे लोणचं खाण्यासाठी तयार आहे प्रत्येक वेळेला लोणचे जेव्हा तुम्ही बरणीतून काढाल त्यावेळेला वेगळ्या चमच्याचा वापर करा नाहीतर लोणच्याला बुरशी लागू शकते
गावच्या ठिकाणी उन्हामध्ये जास्त वेळ हे लोणचे ठेवल्यामुळे त्यातील ओवा नष्ट होतो व ते लोणचे जास्त का टिकत पण आपण इथे मुंबईमध्ये चहा भिंतीच्या हात राहतो त्यामुळे शक्यतो जास्त ऊन हे आपल्याला मिळत नाही त्यामुळे हे लोणचे फ्रीजमध्ये तुम्ही ठेवू शकता हे लोणचे तयार केल्याच्या नंतर पंधरा दिवस ही तुम्ही बाहेर ठेवले तरीही चालेल
पण त्यानंतर मात्र फ्रीजमध्ये ठेवायला विसरू नका
हा व्हिडिओ यातील माहिती तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका
काल तुमच्यामुळे तुम्हाला काही फायदा झाला असेल तर कमेंट्स मध्ये नक्की सांगा
धन्यवाद.....
#pickle #turmericpickle #haldichelonche #recipe #pickles #picklerecipe