prabalgad | prabalgad fort | प्रबळगड | शहाजीराजे, राजमाता जिजाऊ, शिवराय काही काळ राहिले
prabalgad | prabal gad | anudip travel vlog
prabalgad trek | kalavantin durg | prabalgad killa
follow me onkal:https://www.instagram.com/anuradha_khandare_anudip?igsh=cTBmZ2s0czRxN3hw
chapter:
00:00 trailer
01:53 introduction
02:46 video start
03:17 history of prabalgad fort
06:00 kalavantin view point
07:00 cooking on prabalgad fort
07:27 prabalgad rajwada avashesh
09:14 ganesh temple on prabalgad fort
10:30 prabalgad to irshalgad trek way
12:28 last point of prabalgad fort
15:01 ending the video
प्रबळ गडाचा इतिहास :
प्रबळगड हा उत्तर कोकणातील हा किल्ला त्याच्या मुलुखात असलेल्या पनवेल, कल्याण या प्राचीन बंदरांवर नजर ठेवण्यास असावा. किल्ल्यावरील गुहांच्या अभ्यासावरुन त्यांचा कालखंड बौद्ध कालाशी जोडता येतो. त्यांच्यावरील मनुष्यनिर्मित गुहांमुळेच उत्तरकालातील शिलाहार, यादव या राज्यकर्त्यांनी त्याला लष्करी चौकी बनवून मुरंजन असे नाव दिले. बहामनीच्या कालात हा किल्ला आकारास आला असावा.
कालांतराने अहमदनगरच्या निजामशाहीच्या ताब्यात तो आला. निजामशाहीच्या अस्तावेळी शहाजीराजांनी निजामशाहीच्या वारसाला छत्र धरून निजामशाही वाचवण्याचा प्रयत्न केला. पण मोगल सम्राट शाहजहान आणि विजापूरचा आदिलशहा यांनी तह करून आपल्या संयुक्त फौजा शहाजीराजांच्या मागावर पाठवल्या. तेव्हा शहाजीराजे कोंढाणा व मुरंबदेवाच्या डोंगरात निघून गेले.
नंतर कोकणात जंजिऱ्याच्या सिद्दीकडे गेले असता त्याने आश्रय नाकारल्यावर चौलला पोर्तुगीजांकडे गेले. पण त्यांनीही नकार दिल्यावर शहाजीराजे जिजाऊ, बालशिवाजी आणि लष्करासह मुरंजनावर गेले.
शिवरायांनी जावळीच्या चंद्रराव मोरेला हरवून जावळी ताब्यात घेतली, त्याचवेळी म्हणजे १६५६ मध्ये शिवरायांचा शूर सरदार आबाजी महादेव याने कल्याण भिवंडी पासून चेऊल ते रायरीपर्यंतचा सारा मुलूख स्वराज्यात घेतला. तेव्हा मुरंजन शिवाजी महाराजांच्या ताब्यात आला.
किल्ल्याचे नाव बदलून किल्ले प्रबळगड असे ठेवण्यात आले. पुढे १६६५ मध्ये पुरंदरच्या तहानुसार मोगलांना दिलेल्या २३ किल्ल्यांमध्ये प्रबळगड शिवाजी महाराजांनी दिला. जयसिंगाने किल्ल्यावर राजपूत केशरसिंह हाडा हा किल्लेदार नेमला. पुढे पुरंदरचा तह मोडला.
मराठे किल्ले परत घेत असतांना मराठयांशी झालेल्या लढाईत केशरसिंह धारातीर्थी पडला. तत्पूर्वी राजपूत स्त्रियांनी जोहार केला. केशरसिंहाची आई व दोन मुले किल्ल्याच्या झडतीत सापडले.शिवरायांच्या आदेशानुसार त्याने सन्मानाने देऊळगावी मोगल छावणीत पाठवण्यात आले.
#prabalgad #prabagadfort #anudiptravelvlog