#BolBhidu #SantoshDeshmukh #WalmikKarad
संतोष देशमुख हत्याप्रकरणी घटनेच्या सुमारे 80 दिवसांनी 1500 पानांचं दोषारोपपत्र म्हणजेच चार्जशीट अखेर दाखल करण्यात आलीय. सीआयडीचे प्रमुख बसवराज तेली, एसआयटीचे प्रमुख किरण पाटील आणि तपासाधिकारी अनिल गुजर यांनी बीड न्यायालयात गुरुवारी दुपारी चार वाजता हे दोषारोपपत्र दाखल केलंय. सरकारी वकील म्हणून अॅड. उज्ज्वल निकम यांची नियुक्ती आणि 90 दिवसांच्या आत हे दोषारोप पत्र दाखल झाल्यानं अटकेतील आणि संशयीत आरोपींना सरकार सोडणार नाही, असंच आता बोललं जाऊ लागलंय. दरम्यान पोलीसांनी आठ आरोपींना अटक केली असली तरी कृष्णा आंधळे अजूनही फरार आहे.
दुसरीकडं काही पोलीस अधिकाऱ्यांसह अनेकांवर मुख्य आरोपींना सहकार्य केल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे या सगळ्याबाबत 1500 पानांच्या दोषारोपपत्रात नेमकं काय म्हटलं आहे, चाटे, घुलेच्या मोबाईलमध्ये काय सापडलं, त्यामुळं वाल्मीक कराडसह सर्व आरोपी अडकणार का आणि याबाबत राजकीय वर्तुळातून काय आरोप केले जातायत, हेच या व्हिडिओतून आपण पाहणार आहोत.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : https://www.facebook.com/BolBhiduCOM
➡️ Twitter : https://twitter.com/bolbhidu
➡️ Instagram : https://www.instagram.com/bolbhidu.com/
➡️Website: https://bolbhidu.com/