Taklyachi Bhaji | Raan Bhaji | सर्वगुण संपन्न औषधी पावसाळी रान भाजी । टाकळ्याची भाजी | Homemade Way | Making Wild Veggies
............................................................................................................
साहित्य - ४ जुडी टाकळ्याची भाजी, एक वाटी ओल्या नारळाचा खीस, ५/६ कडीपत्त्याची पाने, ५ हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या, ½ tbl spn राई, ½ tbl spn जीरे, २० ग्रॅम ८०% उकडलेली चणा डाळ, २० ग्रॅम उकडलेले शेंगदाणे, १ कांदा बारीक चिरलेला, १० ग्रॅम गूळ, १ tea spn हळद, ४ tbl spn तेल आणि चवीनुसार मीठ.
कृती - प्रथम टाकल्याच्या भाजीचे पाने निवडून त्यांना ३/४ पाण्यात स्वच्छ करून घ्यावी आणि १० मिनिटे एक ग्लास पाणी घालून उकडून घ्यावी. एका पातेल्यात तेल गरम करून त्यात राई, जिरे, मिरची, कांदा आणि कडीपत्ता घालून फोडणी परतून घ्या. कांदा लालसर झाल्यानंतर त्यात चणाडाळ आणि शेंगदाणे घाला. सोबत हळद घालून सर्व जिन्नस एकजीव करा. आता यात उकडलेली टाकल्याची भाजी घाला. आता चवीनुसार मीठ घालून भाजी एकजीव करून घ्या. वर झाकण ठेवून ५ मिनिटे वाफ काढावी. ५ मिनिटांनी झाकण उघडून त्यात ओल्या नारळाचा खीस आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालून भाजी पुन्हा एकजीव करून घ्यावी आणि शेवटची ३ मिनिटे वर झाकण ठेवून वाफ काढावी. ३ मिनिटांनी गॅस बंद करावा आणि गरमागरम टाकल्याची भाजी चपाती सोबत सर्व्ह करावी. धन्यवाद !