🔴सप्तरंगी संगीत जीवन प्रस्तुत🔴
नमन गीत, गणेश आराधना सन २०२५
🔸वाही देवा आरती ही तुला ..! 🔸
निर्मित: मंगेश कुळये, गणेश घेवडे
लेखक/गीतकार : सुनिल घेवडे
पार्श्वगायिका :- कु. प्रतीक्षा घाणेकर
कोरस :- सिद्धी धूमक, सानिका कनसे,सिद्धी गोरिवले,सानिका कुरटे ,ऋतुराज दिवेकर,श्रेयश घेवडे,
संकल्पना: सचिन कुरटे
विशेष सहकार्य-मार्गदर्शक : कृष्णा येद्रे, संदीप पालेकर सर, प्रसाद दळवी,ऋषभ घेवडे,सौरभ कुरटे ,राकेश डाफळे
संगीत/संयोजन-रेकॉर्डिंग: संदीप पालेकर सर, स्वराधिश स्टुडिओ ( डोबिवली)
कलाकार : जान्हवी कुरटे,स्वानंदी निंबरे,फ्लेविआ फर्नांडिस
व्हिडिओ संपादक-एडिटर : शुभम घेवडे, सलोनी घेवडे.
🟣गणेश आराधना 🟣
वाही देवा आरती ही तुला,आले तुझ्या दर्शनाला
देह भाव अर्पिते तुजला,भुलले तुझ्या मी या रुपाला !!धृ!!
साजूक तुझी मंगल मूर्ती, देखणे रुप तुझे नैनात वसती
म्हणती बाप्पा तुला गणपती,विद्येचा देव तू अधिपती..
कार्यरंभी पूजीती पहिला, मंगल कार्याचा मान तुला
वाही देवा आरती ही तुला, आले तुझ्या दर्शनाला
देह भाव अर्पिते तुजला, भुलले तुझ्या मी या रुपाला !!१!!
तुझ्या पूजेत महत्व दुर्वाना ,वाहिली तुला पुष्प सुमन
तुझ्या चरणाशी होऊन लिन, चूक भूल आमुची घे समजून
प्रथम वंदन हे गणा तुला, सुख दुःखात साथ दे मला
वाही देवा आरती ही तुला, आले तुझ्या दर्शनाला
देह भाव अर्पिते तुजला, भुलले तुझ्या मी या रुपाला !!२!!
Saptrangi_jeevan
#Saptrangi_sangeet_jeevan
#सप्तरंगी_संगीत_जीवन
#सप्तरंगी_जीवन
#कोंकणी_स्वर
#Kokani_Swar
#kokankar
#सप्तरंगी
#saptrangi_kokan_kalamanch_mumbai
#skkmcreation
#me_kokani_suraj
#Kokani_teja