मी सध्या चेन्नई मधे आहे आणि मला आता तोडकी मोडकी तमिळ जमत आहे, तर मला माझ्या कामात मदत करणाऱ्या आजीकडून काही दक्षिण भारतीय पदार्थ मी शिकून घेत आहे. जेणेकरून पदार्थाला एकदम साऊथ इंडियन टेस्ट यावी.
या व्हिडिओ मधे मी त्यांच्याकडून नारळाची चटणी शिकून घेतली आणि त्याचीच कृती त्यांनी तमिळ भाषेत आणि मी मराठी भाषेत या व्हिडिओ मधे सांगितली आहे, कशी वाटते बघा.
पदार्थ आवडला आणि, इडली, वडा, सांबार, पायसम असे कोणतेही साऊथ इंडियन पदार्थ तुम्हाला शिकायचे असतील तर कमेंट करून मला नक्की सांगा आपण ते सुद्धा शिकून घेऊ 😊😊😊
साहित्य
ओलं नारळ -1 वाटी
दाळव -1/2 वाटी
लसूण -4 पाकळ्या
आद्रक -1/2 इंच
हिरवी मिर्ची - 2
मीठ - चवीनुसार
माझं watsapp channel join करण्यासाठी लिंक 👇https://whatsapp.com/channel/0029Va9X73jDZ4LefHD37m0p
#coconutchutney ,#coconutchutneyrecipe ,#नcoconutchutneyforidli