MENU

Fun & Interesting

लग्नात लग्न (भाग पाचवा) || पत्रिका जुळणे || धमाल विनोदी कथा || लेखिका नीलिमा क्षत्रिय

Nilima Kshatriya 613 lượt xem 3 weeks ago
Video Not Working? Fix It Now

लग्नात लग्न (भाग पाचवा) || पत्रिका जुळणे || धमाल विनोदी कथा || लेखिका नीलिमा क्षत्रिय

कांताने मोबाईलवर दिलेला फोटो घेऊन सुनीता घरी परतली. मुलीला मनस्वीला फोटो दाखवल्यावर रिवाजाप्रमाणे तिने बराच थयथयाट केला. मग लहान थोरांची दोन चार चर्चा सत्रे झडली आणि शेवटी असा निष्कर्ष निघाला की स्थळ मुलीला वाटतं तितकं टाकाऊ नाही. सुनीताने मुलीला अचानक म्हटलं, "बाबा बघ बरं, माझ्यापेक्षा काळेच आहेत की नाही, मी नाही का केलं लग्न?"
बाबांना अचानक आपल्यावर असा हल्ला होईल याची कल्पना नसल्याने ते बसल्या जागी दचकले. आणि पाटोद्याच्या आणि तळेगावच्या दोन मुलांनी आपल्याला पण आपल्या वजनावरून नाकारलंच आहे, हेही आडून आडून सुनीताने मुलीच्या निदर्शनास आणून दिलं. हो नाही करता करता कांताला फोन गेला. कांताने लगेच पुढची चाल खेळली. मुलीची पत्रिका मागवली. लग्नात मरणाच्या घाईवर आलेली कांता पत्रिका पाठवल्यावर आता कोमात गेल्यासारखी गार पडून गेली. एक-दोन आठवड्यांनी तिला डिवचल्यावर कळलं की पत्रिकेत काहीतरी प्रॉब्लेम आहे. मग आणखी एक दोन आठवड्यात तिकडून ग्रीन सिग्नल आला आणि लगेचच मुलगी दाखवण्याचा कार्यक्रम ठरला. आता सुनीताच्या घराला 'दर्याला आयलंय उधान' अशी अवस्था प्राप्त झाली. घरात बरीच खरेदी झाली. एका दुपारी आम्ही दोघींनी मिळून हॉलच्या पडद्यांची खरेदी केली. सोफ्याचे कव्हर बदलले. मुलीला दाखवताना कोणती साडी नेसवायची यावरून बराच काथ्याकूट झाला. पण तेवढ्यात कांताने मुलाकडच्यांचा निरोप आणला. "त्यांना मुलगी साडी आणि ड्रेस मध्ये, तसंच जमलंच तर जीन्समध्येही बघायची आहे. सासू फार हौशी आहे ना!" मी मनात म्हटलं, चहा पोहे झाल्यावर, चल जरा सोसायटीच्या स्विमिंगपूल मध्ये जरा स्विमिंग करून दाखव असं निमित्त करून स्विमिंग कॉस्च्युम नाही घालायला लावू म्हणजे मिळवली. बायकांची हौस कुठल्या थराला जाईल याचा काही नेम नसतो. त्यात नुकत्याच मॉड झालेल्या नवमॉडांचं तर काहीच खरं नसतं!! तर एक साडी, एक टॉप लेगिन, एक जीन्स टॉप असं सगळं वेगळं काढून ठेवलं. त्यातही टॉप्स स्लिव्हलेस निवडले गेले. सुनीताने पण मग विहिणीला दणका म्हणून जीन्स किंवा लेगिन वरच एखादा टॉप घालायचा ठरवलं. मुलगी तर तो टॉप पण स्लीव्हलेसच घालावा म्हणून अडून बसली. पण मीच हस्तक्षेप करत ते सगळं हाणून पाडलं आणि सुनीताला साडीच्या वळणार आणून सोडलं.. मग मेनू ठरवायला घेतला. सगळ्यांचं म्हणणं पडलं, "सगळे पोहेच करतात आपण काहीतरी वेगळं करूया". आधी इडली सांबारचा विचार पुढे आला. तेव्हा सुनीताच्या सासूने प्रखर विरोध दर्शवला. "नको, नको इडली सांबार अजिबात नको. लहान पोरं, म्हातारे कोतारे सांडलवंड करतात. त्या सरीच्या पोराला पोरगी पाहायला गेलो होतो आम्ही .त्यांनी वडा सांबर केला होता. सरीच्या सासऱ्याने वडा तोडता तोडता वडा जे उडाला तो थेट पोरीच्या आईच्या तोंडावरच गेला. सांबार सगळं म्हाताऱ्याच्या पायजम्यावर. गरम गरम सांबार गं.. म्हातारा घरी येईपर्यंत हाशहूश करत होता. आज इतकी वर्ष झाली पण म्हाताऱ्याने परत वडा सांबार म्हणून कधी खाल्ला नाही, की इडली सांबारला शिवला नाही. म्हातारा आजारी आहे. सरी म्हणत होती भेटून जा, भेटून जा.. पण आपला जीणं आता असं परस्वाधीन. मस गाड्या घोडे आहेत घरात, पण मला मेलीला कोण नेतं कोल्हापूरला. आपण असंच वाट पाहत राहायचं, आज नेईल कोणी उद्या नेईल".. सुनिताच्या सासूने इडली सांबार पार कोल्हापूरच्या सरीच्या सासऱ्याच्या पायजम्यावर नेऊन ओतला. त्या बोलण्यातले चिमटे ज्याचे त्याला व्यवस्थित पोहोचल्याचं मंडळींच्या चेहऱ्यावरून ताबडतोब लक्षात येत होतं. त्याला प्रतिक्षिप्त प्रतिक्रिया म्हणून सुनीताच्या नवऱ्याने ताबडतोब पेपर मध्ये तोंड खुपसलं. मुलाने राहुलने लॅपटॉप मध्ये खूपसलेलं डोकं वर उपसलं. सुनीता कडे त्याने वाकशस्त्र चालवण्याची परवानगी घेण्याच्या दृष्टीने नजर टाकली. तिने माफक परवानगी दिलेली त्याच्या लक्षात आली, मग त्याने आजीकडे मोर्चा वळवला, कारण म्हातारीने त्यांची कागाळी माझ्यापुढे केली होती. मला दुसरी बाजू कळणं आता गरजेचं होतं. तो म्हणाला, "आजीबाई कोल्हापूरला जायला किती तासांचा रस्ता आहे? आठ तासांचा.. आपला पाय मोडला होता, प्लास्टर काढून किती दिवस झाले? पंधरा दिवस.. इतका वेळ आपल्याला गाडीत बसवेल का? नाही.. ट्रॅव्हल्सने बसवून दिलं तर झोपून जाता येईल.. आपण एकटंच जाऊ शकतो का? "मी मनातल्या मनात, " नाही"
पण तिकडे उत्तर हो आलं होतं. हो एकटं जाऊ शकतो आपण, पण आपल्याला राजे राजवाड्यांसारखे आख्खं खानदान घेऊन फिरायची हौस. स्वत:च्या सेवेला मुलगा पाहिजे, मुलाच्या सेवेला सून पाहिजे, त्यांच्या हाताखाली फिरवायला नातू पाहिजे.. आता बाबांना आईला कामधंदा सोडायला लावा, मी पण कॉलेज जमलं तर करतो, नाहीतर तेही सोडतो आणि सर्वजण मग सगळ्यांकडे जाऊ.. सरूआत्याकडे जाऊ, खंडू मामाकडे जाऊ.. महिना महिना राहू.. पण आपल्याला कमोड शिवाय होतं का? मी मनातल्या मनात, 'नाही'

#marathilekhika
#marathi
#marathikathakathan
#marathikatha
#निलीमाक्षत्रीय
#nilimakshatriya
#storytelling
story telling
storytelling

Comment