स्पेशल गावरान मटन थाळी दीड किलो प्रमाणात रेसिपी | Mutton rassa recipe / sukka matan saritas kitchen
रोज जेवणात काय बनवायचं ? प्रत्येक स्वयंपाक करणाऱ्या गृहिणीला पडणारा मोठा प्रश्न | रोज सकाळी नाष्टा काय यानंतर जेवण काय बनवू हे सुचत नाही | त्याच त्याच भाज्या खाऊन पण सर्व कंटाळतात | त्यामुळे हा प्रश्न सोडवण्यासाठी sarita kitchen मध्ये आपण थाळी आणि नाष्टा सिरीज चालू केली आहे |
तसेच one pot meal पौष्टिक रेसिपीस पण शेअर केल्या जातील | या मध्ये महाराष्ट्रियन साधी थाळी , महाराष्ट्रियन थाळी , व्हेज थाळी , स्पेशल थाळी , पुरणपोळी थाळी अश्या वेगवेगळ्या थाळी शेअर करण्याचा प्रयत्न करेन | तसेच नॉनव्हेज थाळी पण असतील , गावरान झणझणीत मटन थाळी , चिकन थाळी , फिश थाळी , अंडा थाळी आणि बरेच काही . आणि नाष्टा सिरीज मध्ये सुद्धा पटकन होणारे नाष्टा प्रकार दाखवण्याचा प्रयत्न असेल |
आज आपण रविवार स्पेशल किंवा weekend special मेनू बनवतोय | आज आपण बनवतोय #गावरानमटणथाळी | इथे आपण महाराष्ट्रियन पद्धतीने मटन थाळी बनवली आहे | एकदम गावरान पद्धतीने झणझणीत मटण थाळी त्यामध्ये तर्रीदार मटन रस्सा रेसिपी आणि सुक्क मटन रेसिपी शेअर केल्या आहेत | सतसेच कुकर मध्ये परफेक्ट मऊ मोकळा जिरं राइस कसा बनवायचा त्यासाठी बऱ्याच टिप्स सांगितलें आहेत |
मटन रस्सा रेसिपी आपण धनगरी मटन असते तश्या पद्धतीची बनवली आहे | कोल्हापुरी मटन थाळी मध्ये वापरला जाणारा कांदा लसूण मसाला वापरल्याने त्याला एक कोल्हापुरी मटन रस्सा ची चव आली आहे | तसेच हीच पद्धत वापरुन आपण याच प्रकारे चिकन थाळी रेसिपी / चिकन रस्सा रेसिपी सुद्धा बनवू शकतो आणि इथे सुक्क मटन रेसिपी बनवली आहे, ती तर अगदी एका स्टेप मध्ये तयार होते | त्याचे वाटण तर अगदी सोप्पे आहे , आणि मटन रस्सा रेसिपी आणि मटन सुक्का रेसिपी दोन्ही कुकर मध्ये बनवल्या आहेत त्यामुळे पटकन तयार होतात . अगदी तासाभरात ही मटन थाळी तयार होते |
इथे मी अगदी प्रमाण परफेक्ट प्रमाण सांगितले आहे | थाळी साठी लागणारे साहित्य 5-6 लोकाना पुरेल असे आहे :-
साहित्य :- ( गावरान मटन थाळी रेसिपी )
मटन रस्सा रेसिपी / गावरान मटन रस्सा रेसिपी :
मटन पाऊण किलो / 750 gram
हळद 1 tsp
मीठ
अळणी रस्सा रेसिपी :-
तेल 2 चमचे
तमालपत्र 3-4
बारीक चिरलेला कांदा 2 मध्यम
आले लसूण पेस्ट 1/2 चमचा
कोथिंबीर
तिखट रस्सा रेसिपी वाटण :-
कांदे 3 मध्यम
पांढरे तीळ 3 tsp
सुके खोबरे किसून पाव वाटी
लसूण 20-25 पाकळ्या
आले दीड इंच
कोथिंबीर मूठभर
रस्सा रेसिपी फोडणी :-
तेल 3 चमचे
मिरची पावडर 2 tsp
काळा मसाला ( कांदा लसूण मसाला ) 2 tsp
मटन मसाला 2 tsp
कोथिंबीर
सुक्का मटन रेसिपी / गावरान सुक्क मटन रेसिपी :-
मटन पाऊण किलो / 750 grams
हळद 1 tsp
मीठ
वाटण :-
कोथिंबीर 1 वाटी
लसूण 15-20
आले 2 inch
ओले खोबरे अर्धी वाटी
दालचीनी 1 इंच
लवंग 4-5
जिरे अर्धा चमचा
फोडणी साठी :-
तेल 3 चमचे
बारीक चिरलेला कांदा 3 मध्यम
बारीक चिरलेला टोमॅट 1 मोठा
मिरची पावडर 2 चमचे
काळा मसाला / कांदा लसूण मसाला 2 चमचे
धने पूड दीड चमचा
पानी अर्धा ग्लास
मटन मसाला 2 चमचे
कोथिंबीर
जीरा राइस रेसिपी :-
तांदूळ 1 कप
पानी दीड कप
मीठ
तूप 2 चमचे
जिरे दीड tsp
कोथिंबीर
In this rojchya jevanachi thali series and nashta series we are going to see variety of daily thali, like maharashtrian thali, veg thali, special veg thali, gujarathi thali recipes, purampoli thali recipe, restaurant style or dhaba style recipes and many more . and in nashta series we will see how to make breakfast quick and fast. in this will share diff nashtaa recipes which can be prepared in daily morning breakfast. also you can make it for tiffin recipe
Today in saritaskitchen / saritasrecipes we will see a simple nonveg thali recipe. we have seen veriety of chicken recipes and mutton thali reciepes earlier. Mutton sukka recipe, chicken sukka recipe , 1 kilo mottun rassa aani sukka recipe, 1 kilo chicken rassa and chicken sukka recipe |
In this thali we will make village style mutton sukka and mutton rassa recipes in some different way. We will see dhanagari mutton rassa recipe. which is quite similar to kolhapuri mutton thali / maharashtrian mutton thali recipes | mutton sukka recipe is very easy and can be prepared in only one step . mutton rassa recipe is also very easy and made with different vatan | I have prepared gavaran tarridar matan rassa and gavaran zanzanit matan sukka in the same way you can make gavran chicken rassa and chicken sukka recipe. In saritas kitchen we will see many more veg and nonveg special thali recipes in this thali series | Also in breakfast series we will make veriety of breakfast recipes. Subscribe to saritaskitchen to watch both the seires.
Recipes learned this special mutton thali video :-
1) mutton rassa recipe / gavran mutton rassa recipe / kolhapuri tambada rassa recipe / dhanagari mutton recipe
2) sukka mutton recipe / gavran sukka mutton recipe / kolhapuri matan recipe / maharashtrian matan recipe / dhanagari matam recipe
3) chapati recipe / bhakari recipe
4) jeera rice recipe / perfect jira rice in cooker / dhaba style jeera rice recipe
5) dhaba style mutton thali recipe / dhaba style chicken recipe
#स्पेशलमटनथाळीरेसिपी #गावरानमटनथाळीरेसिपी #महाराष्ट्रियनमटनथाळी #धनगरीमटनथाळी #मटनरस्सा #1किलोमटनरस्सा #1किलोसुक्कामटन #चिकनरेसिपी #specialmuttonthali #kolhapuritambadarassarecipe
#solkadhirecipe #jeeraricerecipe #sairitaskitchen #saritasrecipes #dhabastylechickenthali