#MrunmayeeLagoo #Aarpaar #आरपार
तुम्हाला माहितीये का? तापसी पन्नूचा 'थप्पड', जिग्ना वोरावर आलेली 'स्कूप' या दर्जेदार कलाकृतींची लेखिका कोण आहे... मृण्मयी लागू! हो... तीच 'दोघांत तिसरा, आता सगळा विसरा' मधली अभिनेत्री... सध्या ती काय करते? तर सध्या ती बरंच काय काय करते. आमीर खानच्या वर्तुळात वावरते, अनेक हिंदी चित्रपटांना सहाय्यक दिग्दर्शन करते, उत्तम चित्रपट आणि वेबसिरीज लिहीते. आमीरच्या गाजलेल्या 'सत्यमेव जयते' या कार्यक्रमाची असिस्टंट डिरेक्टर म्हणूनही तिने काम पाहिलंय... या सगळ्यासोबतच अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे मराठी-हिंदी चित्रपटसृष्टी गाजवलेल्या ज्येष्ठ अभिनेत्री रिमा लागू यांची ती लेक आहे!
मराठी मुलांनी बॉलीवूडमध्ये कसं यावं, बॉलीवूडची दुनिया कशी आहे, प्रेक्षकांना नक्की काय बघायचं असतं, आणि ते कलाकार लेखकांनी प्रेक्षकांना हव्या असलेल्या गोष्टी कशा द्यायच्या या सगळ्यावर 'वुमन की बात' मध्ये मृण्मयीने मस्त गप्पा मारल्या आहेत. हा एपिसोड कसा वाटला ते नक्की सांगा!