#BolBhidu #INDvsNZ #ChampionsTrophy2025
चॅम्पियन्स ट्रॉफीचा रिझल्ट लागून जवळपास 3 दिवस झाले, पाकिस्तानच्या माजी प्लेअर्सनं टीम इंडियावर टीका केली. इंग्लिश आणि ऑस्ट्रेलियन मीडियानं तर जुने दाखले देत टीम इंडिया आणि बीसीसीआयला टार्गेट केलं. कुणाचं म्हणणं आहे आयसीसीनं बीसीसीआयसाठी आम्हाला डावललं तर कुणाचं म्हणणं आहे, टीम इंडिया जिंकली कारण एकाच ग्राऊंडवर सगळ्या मॅचेस खेळली. पण या सगळ्यात न्यूझीलंडच्या एकाही प्लेअरकडून कसलीच तक्रार आली नाही, उलट त्यांच्या कॅप्टननं भारतीय कॅप्टनचं म्हणजेच रोहित शर्माचं कौतुक केलं. ना कुठल्या ना कसले टोमणे. सेमीफायनलला ऑस्ट्रेलियाला हरवल्यावर आपल्याकडे सोशल मीडियावर सुद्धा जल्लोष सुरु होता. बदला घेतल्याच्या मिम्स येत होत्या, पण ट्रॉफी जिंकल्यावरही न्यूझीलंडचं ट्रोलिंग झालं नाही. उलट रील्स व्हायरल झाले, त्यांचं कौतुक करणारे,त्यांच्या खेळाला आणि त्यांच्या खेळाडूवृत्तीला सलाम करणारे रिल्स.
गेल्या 10 वर्षात जागतिक क्रिकेटमधल्या सगळ्यात कन्सिस्टंट क्रिकेट टीम्सपैकी एक म्हणून कायम न्यूझीलंडचं नाव घेतलं जातं. चॅम्पियन्स ट्रॉफी सुरु होण्याआधी टीम इंडियाच्या काही प्लेअर्सचे व्हिडीओ शूट झाले होते, त्यांना विचारण्यात आलं की टीम इंडिया फायनलमध्ये गेली तर समोर अपोनंट कोण असेल ? बहुतांश प्लेअर्सचं उत्तर होतं, न्यूझीलंड. प्लेअर्सपासून चाहत्यांपर्यंत सगळ्यांचं प्रेम मिळवणं न्यूझीलंडला जमतं कसं ? पराभव होऊन सुद्धा न्यूझीलंडला मानलं पाहिजे राव अशा प्रतिक्रिया का येतात ? त्याचीच ही स्टोरी.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : https://www.facebook.com/BolBhiduCOM
➡️ Twitter : https://twitter.com/bolbhidu
➡️ Instagram : https://www.instagram.com/bolbhidu.com/
➡️Website: https://bolbhidu.com/