#BolBhidu #SantoshDeshmukhCase #KrishnaAndhale
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर ८० दिवसांनी चार्जशीट दाखल करण्यात आलं. त्या चार्जशीटमधील देशमुखांना मारतानाचे आरोपींचे फोटो बाहेर आले आणि राज्यातून संताप व्यक्त केला गेला. या प्रकरणात सात जणांविरोधात गुन्हा दाखल झाला असला तरीही आठवा आरोपी कृष्णा आंधळे हा गेल्या तीन महिन्यांपासून फरार आहे. त्यामुळं आंधळे कुठंय, तो पोलिसांच्या हाती का सापडत नाही, असे अनेक प्रश्न निर्माण केले जात होते.
दरम्यान आता आंधळेबाबत मोठी माहिती समोर आलीय. फरार कृष्णा आंधळे हा नाशकात असल्याची माहिती काही स्थानिकांकडून देण्यात आलीय. त्यामुळं आता नाशकात त्याचा शोध घेतला जातोय. तर देशमुख हत्या प्रकरणी चार्जशीट दाखल झाल्यानंतर १३ दिवसांनी पहिली सुनावणीही पार पडलीय. या सुनावणीत नक्की काय झालं, फरार असलेल्या कृष्णा आंधळेबाबत कोणती माहिती समोर येतेय, त्याचीच माहिती या व्हिडिओमधून जाणून घेऊयात.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : https://www.facebook.com/BolBhiduCOM
➡️ Twitter : https://twitter.com/bolbhidu
➡️ Instagram : https://www.instagram.com/bolbhidu.com/
➡️Website: https://bolbhidu.com/