#ओल्याहळदीचेलोणचे #लोणचे #हळदीचेलोणचे #डावीबाजू #तोंडीलावणे #चटपटीतलोणचे #लीनाजसुगरणकट्टा #लीनाजोशी
ओल्या हळदीचे लोणचे
ओली हळद २५० ग्रॅम
आले ३० ग्रॅम
लिंबाचा रस अर्धी वाटी
किसलेला गूळ अर्धी वाटी
मोहरी डाळ २ टेबलस्पून
लवंगा ५
काळी मिरी १०-१२
मीठ ३ चमचे
तिखट १ टेबलस्पून
काश्मिरी तिखट २ टेबलस्पून
हिंग पाव चमचा
तेल ४ ते ५ टेबलस्पून
आले आणि ओली हळद स्वच्छ धुवून कोरडी करून घ्यावी.
मग साले काढून किसून घ्यावे.
तेल धूर येईपर्यंत तापवून नंतर कोमट करून घ्यावे.
आता एका भांड्यात तेल घालून त्यात मोहरी डाळ, हिंग, लवंग पूड आणि मिरपूड, दोन्ही प्रकारचे तिखट, मीठ आणि गूळ घालून मिक्स करावे. नंतर त्यात किसलेली हळद व आले घालून मिक्स करावे. सगळ्यात शेवटी लिंबाचा रस घालून नीट मिक्स करावे. आपले छान चटपटीत आंबटगोड तिखट ओल्या हळदीचे लोणचे तयार आहे.
Video shooting & editing:
Varun Damle
+91 95459 08040