#BolBhidu #NarendraDabholkarCase #NarendraDabholkarCaseVerdict
अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे प्रमुख नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्येप्रकरणी पुण्यातील विशेष न्यायालयाने आज १० मे रोजी अंतिम निकाल दिला. या प्रकरणात पाच प्रमुख आरोपी होते. त्यापैकी ज्या दोघांनी दाभोळकरांवर गोळ्या झाडल्या त्या सचिन अंदुरे आणि शरद कळसकर यांना जन्मठेपेची शिक्षा आणि पाच लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. तर डॉ वीरेंद्र तावडे, विक्रम भावे आणि संजीव पुनाळेकर यांची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.
निकालावर भाष्य करताना नरेंद्र दाभोळकर यांचे सुपुत्र हमीद दाभोळकर यांनी ज्या दोघांना शिक्षा झाली आहे त्याबद्दल समाधान व्यक्त केलं. मात्र ज्यांची निर्दोष सुटका झाली आहे त्यांच्या विरोधात हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टापर्यंत जाऊ, अशी प्रतिक्रिया दिली आहे. पण, हे संपूर्ण प्रकरण नक्की काय होतं? या प्रकरणाचा निकाल यायला एवढा उशीर का झाला? पाहूयात या व्हिडीओतून.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : https://www.facebook.com/BolBhiduCOM
➡️ Twitter : https://twitter.com/bolbhidu
➡️ Instagram : https://www.instagram.com/bolbhidu.com/
➡️Website: https://bolbhidu.com/