MENU

Fun & Interesting

Pune BMW Video: रस्त्यावर अश्लील कृत्य, Gaurav Ahuja अटकेत, मित्राला जेलमध्ये कोल्ड कॉफी आणि बर्गर ?

BolBhidu 81,182 lượt xem 1 day ago
Video Not Working? Fix It Now

#BolBhidu #GauravAhuja #PuneBMWVideo

पुण्यात काही दिवसांपूर्वीच स्वारगेटचं अत्याचार प्रकरण घडलं, त्यानंतर पुणे पुन्हा हादरलं ते एका श्रीमंत बापाच्या मुलानं केलेल्या अश्लील कृत्यामुळे. शनिवारी ८ मार्चला सकाळी येरवडा जवळच्या शास्त्रीनगर चौकात BMW गाडी थांबवली. त्यानंतर सिग्नललाच लघवी केली आणि जाब विचारायला आलेल्या लोकांसमोर अश्लील कृत्य सुद्धा केलं. या घटनेचा विडियो व्हायरल झाला आणि सगळीकडे रोष व्यक्त केला गेला.

पोलिसांनी पुढच्या काहीच तासात या BMW मध्ये बसलेल्या दोन्ही तरुणांची ओळख पटवून अश्लील वर्तन करणारा गौरव आहुजा आणि त्याचा मित्र भाग्येश निबजिया ओसवालवर गुन्हा दाखल केला. आधी भाग्येशला आणि त्यानंतर कराडमधून गौरवला सुद्धा ताब्यात घेण्यात आलं. हे सगळं घडत असतानाच गौरवचा माफी मागतानाचा व्हिडीओ सुद्धा आला. पण असं असलं तरी गौरव आहुजाचा इतिहास साधा नाही. त्यात त्याचा मित्र भाग्येशला पोलिस स्टेशनमध्ये असताना बर्गर, कोल्ड कॉफी देण्याचा प्रयत्न झाल्याच्या बातम्याही माध्यमांमध्ये आहे. नेमका विषय काय आहे ? जाणून घेऊयात या व्हिडीओमधून.


चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com

✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.

Connect With Us On🔎

➡️ Facebook : https://www.facebook.com/​BolBhiduCOM
➡️ Twitter : https://twitter.com/bolbhidu
➡️ Instagram : https://www.instagram.com/bolbhidu.com/
➡️Website: https://bolbhidu.com/

Comment