Pune BMW Viral Video: भर रस्त्यात गाडी थांबवून अश्लील चाळे, दारु पिऊन धिंगाणा, येरवड्यात काय घडलं ?
#BolBhidu #GauravAhuja #PuneBMWViralVideo
पुणे.. महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी... पण गेल्या काही महिन्यांपासून पुण्यात घडलेल्या घटनांवरुन सुसंस्कृत पुण्यात सध्या चाललंय काय, असाच प्रश्न विचारला जातो. गेल्याच वर्षी पुण्यात झालेलं पोर्श कार अपघात प्रकरण हे फक्त महाराष्ट्रच नाही तर अख्ख्या देशात गाजलं होतं. त्यानंतरही पुण्यातून गुन्हेगारीच्या छोट्या-मोठ्या घटना घडत असल्याचं अनेकदा पहायला मिळालं. अलिकडेच पुण्यातल्या स्वारगेट बस स्थानकात 26 वर्षीय तरुणीवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेनं महाराष्ट्र हादरला होता. पुण्यात कायदा-सुव्यवस्थेचे धिंडवडे निघाल्याचे आरोप झाले. त्यातच पुण्यातून आता आणखी एक धक्कादायक घटना समोर येताना दिसतेय. पुण्यात एका BMW गाडीतून आलेल्या मद्यधुंद तरुणानं भर रस्त्यात अश्लील कृत्य केल्याची घटना शनिवारी घडलीय.
या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्यानंतर त्यावरुन आता मोठा संताप व्यक्त केला जातोय. याबाबत येरवडा पोलिसांनी तरुणांविरोधात गुन्हा दाखल केला असून त्यांचा शोध घेतला जातोय. तसंच या प्रकरणात संबंधित मुलाच्या वडिलांनाही ताब्यात घेण्यात आलं असून त्यांचीही प्रतिक्रिया आता माध्यमांमध्ये यायला सुरुवात झालीय. हे संपूर्ण प्रकरण नक्की आहे काय, भर रस्त्यात अश्लील वर्तन करणारा हा तरुण नक्की आहे कोण, त्याच्या वडिलांनी दिलेली प्रतिक्रिया काय आणि याबाबत पोलिसांचं म्हणणं काय, त्याचीच माहिती या व्हिडिओमधून जाणून घेऊयात.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : https://www.facebook.com/BolBhiduCOM
➡️ Twitter : https://twitter.com/bolbhidu
➡️ Instagram : https://www.instagram.com/bolbhidu.com/
➡️Website: https://bolbhidu.com/