|| जय श्रीराम || || जय श्रीराम || || जय श्रीराम ||
#प्रसादाचाशिरा #हलवा #सूजीकाहलवा #रामकाप्रशाद #शिरा #पूजेचानेवैद्य #श्रीरामकाभोग #रामलल्लाकाप्रशाद #लीनाजसुगरणकट्टा #लीनाजोशी
प्रसादाचा शिरा
सव्वा वाटी रवा
सव्वा वाटी साखर
सव्वा वाटी तूप
अडीच वाटी दूध
१ केळे
दीड चमचा दुधाचा मसाला
काजू, बदाम
पातेल्यात आधी तूप घालावे. ते वितळायला लागले की रवा घालावा. मंद आचेवर रवा भाजावा. आता त्यात केळ्याचे काप आणि काजू बदाम घालावेत. अजिबात घाई न करता मंद आचेवर रवा छान लालसर होईपर्यंत किंवा छान सुगंध येईपर्यंत भाजावा.
दुसरीकडे दूध तापवून घ्यावे. रवा छान भाजला गेला की मग त्यात हे गरम दूध घालून नीट मिक्स करावे. नंतर साखर व दुधाचा मसाला घालून, नीट मिक्स करून दोन मिनिटे झाकून ठेवावे. छान मऊसुत प्रसादाचा शिरा तयार होतो.
|| जय श्रीराम ||
केशरी पेढे विडीओ
https://youtu.be/scXEXoMMvHw?si=BqXMa26232UDPg9z
दुधाचा मसाला विडीओ
https://youtu.be/t7eagdF_sx8?si=-GG3xaCXDS_Szw-q
Video shooting & editing:
Varun Damle
+91 95459 08040