MENU

Fun & Interesting

Suresh Dhas vs Dhananjay Munde: धसांचा धनंजय मुंडेंवर एवढा राग का ? वादाचा सगळा इतिहास

BolBhidu 58,977 lượt xem 1 week ago
Video Not Working? Fix It Now

#BolBhidu #SureshDhas #DhananjayMunde

सुरेश धस आणि धनंजय मुंडे चांगले मित्र होते, असं तुम्हाला कुणी सांगितलं तर त्यावर विश्वास बसेल का ? बसला नाही तरी ठेवा. सुरेश धसांनीच जानेवारी २०१२ मध्ये धनंजय मुंडेंचे वडील पंडितअण्णा मुंडेंना राष्ट्रवादीत आणण्यासाठी फिल्डिंग लावली होती. मग दीड वर्षांनी जुलै २०१३ मध्ये धनंजय मुंडे राष्ट्रवादीत आले. त्यानंतर २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत धनंजय मुंडेंनी गोपीनाथ मुंडेंविरोधात लढणाऱ्या सुरेश धसांसाठी काम केलं. आता मात्र या दोन्ही नेत्यांचा वाद इतका टोकाला गेलाय की ते एके काळी मित्र होते, यावरच सहज विश्वास बसणार नाही. संतोष देशमुखांच्या हत्येनंतर मुंडेंवर टीका करताना धसांनी अजिबात आखडता हात घेतला नाही. धसांनी मागच्या ५२ दिवसांपासून वेगवेगळी प्रकरणं काढून धनंजय मुंडे यांची कोंडी करण्याचा प्रयत्न सुरु ठेवल्याची चर्चा आहे.

मात्र इतरवेळी आक्रमक असलेले धनंजय मुंडे सध्या अडचणीत असल्यानं धसांना थेटपणे उत्तर देताना दिसत नाहीत. तिकडे अजितदादांनी मात्र बीड जिल्हा नियोजन समितीतून धसांना वगळलं आणि हा निर्णय मुंडेंच्या पथ्यावर पडल्याची चर्चा सुरु झाली. या सगळ्यामुळं धस विरुद्ध मुंडे या वादाचा नवा अंक सुरू झाल्याचं बोललं जातंय. पण कधीकाळी मित्र असलेल्या सुरेश धस आणि धनंजय मुंडे यांच्यातल्या वादाचा नेमका इतिहास काय आहे, सध्या हा धस विरुद्ध मुंडे वाद कुठल्या वळणावर आहे ? पाहुयात या व्हिडीओमधून.

चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com

✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.

Connect With Us On🔎

➡️ Facebook : https://www.facebook.com/​BolBhiduCOM
➡️ Twitter : https://twitter.com/bolbhidu
➡️ Instagram : https://www.instagram.com/bolbhidu.com/
➡️Website: https://bolbhidu.com/

Comment