राम कृष्ण हरी ।।
प्रख्यात गायक श्री विश्वजीत बोरवणकर घेउन आलेत
लोकप्रिय अभंग शृंखला
५ अप्रतीम अभंग
1.सुंदर ते ध्यान
2.इंद्रायणी काठी
3.सवाळे सुंदर
4.तीर्थ विठ्ठल
5.याज साठी केला होता
——- Sunder Te Dhyan——-
सुंदर ते ध्यान उभे विटेवरी
सुंदर ते ध्यान उभे विटेवरी
कर कटावरी ठेवोनिया
सुंदर ते ध्यान उभे विटेवरी
सुंदर ते ध्यान
तुळसी हार गळा कांसे पितांबर
तुळसी हार गळा कांसे पितांबर
आवडे निरंतर
आवडे निरंतर तेची रूप
सुंदर ते ध्यान उभे विटेवरी
सुंदर ते ध्यान
मकरकुंडले तळपती श्रवणी
मकरकुंडले तळपती श्रवणी
आ आ आ
मकरकुंडले तळपती श्रवणी
कंठी कौस्तुभमणी विराजीत
सुंदर ते ध्यान उभे विटेवरी
सुंदर ते ध्यान
तुका म्हणे माझे हेची सर्व सुख
तुका म्हणे माझे हेची सर्व सुख
पाहीन श्रीमुख
पाहीन श्रीमुख आवडीने
सुंदर ते ध्यान उभे विटेवरी
सुंदर ते ध्यान उभे विटेवरी
सुंदर ते ध्यान
——-INDRAYANI KATHI——
इंद्रायणी काठी, देवाची आळंदी
लागली समाधी, ज्ञानेशाची हो ज्ञानेशाची, इंद्रायणी काठी ॥धृ॥
ज्ञानीयांचा राजा भोगतो राणीव ज्ञानीयांचा राजा, ज्ञानीयांचा राजा ज्ञानीयांचा राजा भोगतो राणीव नाचती वैष्णव, वैष्णव
नाचती वैष्णव, मागे पुढे ...इंद्रायणी काठी ॥1॥
मागे पुढे दाटे ज्ञानाचा उजेड, मागे पुढे दाटे हो ज्ञानाचा उजेड
मागे पुढे दाटे हो ज्ञानाचा उजेड, अंगणात झाड, कैवल्याचे ...इंद्रायणी काठी ॥2॥
उजेडी राहीले उजेड होवून, उजेडी राहिले उजेड होवून
निवृत्ती सोपान मुक्ताबाई, निवृत्ती सोपान मुक्ताबाई
इंद्रायणी काठी, देवाची आळंदी ...इंद्रायणी काठी ॥3॥
अभंग म्हणजे भक्तीची परमसत्ता! संतांची वाणी हृदयाला स्पर्श करणारी असते आणि आत्म्याला शांती देणारीही! या भक्तिमय अभंगाच्या माध्यमातून आपण ईश्वराच्या चरणी नतमस्तक होऊया.
——-SAWALE SUNDER——
सावळें सुंदर रूप मनोहर ।
राहो निरंतर हृदयीं माझे ॥१॥
आणिक कांही इच्छा आम्हां नाहीं चाड ।
तुझें नाम गोड पांडुरंगा ॥२॥
जन्मोजन्मीं ऐसें मागितलें तुज ।
आम्हांसी सहज द्यावें आतां ॥३॥
तुका म्हणे तुज ऐसे दयाळ ।
धुंडितां सकळ नाहीं आम्हां ॥४॥
—-TEERTH VITTHAL—-
तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल ।
देव विठ्ठल, देवपूजा विठ्ठल ॥१॥
माता विठ्ठल, पिता विठ्ठल ।
बंधु विठ्ठल, गोत्र विठ्ठल ॥२॥
गुरू विठ्ठल, गुरुदेवता विठ्ठल ।
निधान विठ्ठल, निरंतर विठ्ठल ॥३॥
नामा म्हणे मज विठ्ठल सापडला ।
म्हणुनि कळिकाळा पाड नाही ॥४॥
——YAJ SATHI KELA—-
याजसाठी केला होता अट्टहास
शेवटचा दिस गोड व्हावा
शेवटचा दिस गोड व्हावा
याजसाठी केला होता अट्टहास
आता निश्चितीने पावलो विसावा,
खुंटलिया धावा...
खुंटलिया धावा तृष्णेचिया
कवतुक वाटे जालिया वेचाचे
नाव मंगळाचे तेणे गुणे
तुका म्हणे, मुक्ती परिणिली नोवरी
आता दिवस चारी...
आता दिवस चारी खेळी-मेळी
याजसाठी केला होता अट्टहास
याजसाठी केला होता अट्टहास
————————-
✨ या अभंगात तुम्हाला मिळेल:
✔️ संतांची गूढ आणि गोड वाणी
✔️ आत्मशुद्धी आणि भक्तीचा अनुभव
✔️ मनःशांती आणि सकारात्मक ऊर्जा
🔔 व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा!
#marathiabhang #santvani #bhaktigeet #devotionalsongs #marathibhaktigeete