शेतकरी आज मजुरांच्या समस्येमुळे खूप वैतागलेला आहे. मजुरांची मनधरणी करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. त्यातल्या त्यात पिकांना हमीचा बाजारभाव नाही. मात्र, कृषी साहित्य विक्रेते आणि मजुरांचे दर फिक्स आहेत. अशा वेळी शेतकऱ्याने शेती ही मजुरांसाठी करावी की कृषी दुकानदारांसाठी असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही. याच मुद्द्यावर विना नांगरणी शेती तंत्रानुसार गेल्या पाच वर्षांपासून शेती कसणारे देवगाव, ता. पैठण, जि. छत्रपती संभाजीनगर येथील दीपक जोशी यांनी मनोगत व्यक्त केले.
#pratapkakachiplunkar
#vinanangarnisheti
#deepakjoshi
#shivarnews24
#विनानांगरणीशेती