#BolBhidu #Aurangzeb #MughalEmpire
ही गोष्ट शाहजहान आजारी पडला तेव्हाची. त्याची चारही मुले पुढे जाऊन या साम्राज्याचा सम्राट होण्याची स्वप्ने पाहत होती. फक्त आपल्या बापाच्या मरणाची ते वाट पाहत होते. सम्राट अकबराने एक पद्धत सुरु केली होती, झरोखा पद्धत. जेव्हा जेव्हा बादशाह आपल्या राजधानीत असे, तेव्हा खिडकीमध्ये येऊन प्रजेला दर्शन देत असे. पुढे जहाँगीर, शाह जहान यानेही ही प्रथा सुरू ठेवली. पण एक विशिष्ट वेळ ठरवली. पण याचा परिणाम असा झाला, की बादशाह राजधानीत असूनही जर खिडकीमध्ये आला नाही, तर तो आजारी पडला अशी बातमी सगळीकडे पसरत असे.
नेमकं हेच झालं. शाह जहान आजारी पडला, साऱ्या राजधानीत ही बातमी पसरली आणि त्याच्या चारही मुलांचे स्वप्न पूर्ण होण्याची शक्यता निर्माण झाली. पण हे वाटतंय तितकं सोपं नव्हतं, नक्कीच नव्हतं. कारण ज्याला गादीवर बसायचं आहे, त्याला केवळ बापाच्याच मरणाने फायदा होणार नव्हता, तर आपल्या भावांचाही काटा काढावा लागणार होता. भावांचे विश्वासू साथीदार, भावांचे सरदार, मुत्सद्दी यांनाही शांत बसवायचे होते. तर आणि तरच हे शक्य होणार होत. मुघलांच्या रक्तरंजित वारसायुद्धाची ही विचित्र कहाणी.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : https://www.facebook.com/BolBhiduCOM
➡️ Twitter : https://twitter.com/bolbhidu
➡️ Instagram : https://www.instagram.com/bolbhidu.com/
➡️Website: https://bolbhidu.com/