#BolBhidu #MarathaReservation #HelviSamaj
सध्या राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा शिगेला पोहोचलाय, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ६ सप्टेंबरला निजामकाळातल्या नोंदींनुसार कुणबी दाखले देणार असल्याची घोषणा केली. त्यानंतर सध्याच्या मराठा आरक्षण आंदोलनाचा मुख्य चेहरा असलेले मनोज जरांगे पाटील काय भूमिका घेतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. मात्र त्यांनी शासनाच्या आदेशातल्या वंशावळ शब्दावर आक्षेप घेत, तो वगळण्याची मागणी केली. मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आदेशानुसार निजामकाळातल्या नोंदी तपासताना वंशावळीही तपासल्या जातील. जर वंशावळी तपासण्याची पद्धत आली तर सरसकट मराठवाड्यातल्या मराठ्यांना कुणबी दाखला मिळणं अवघड होऊ शकतं.
पण जेव्हा वंशावळींचा, मराठ्यांच्या कुणबी म्हणून असलेल्या नोंदीचा विषय चर्चेत येतो, तेव्हा हेळवी समाज चर्चेत येतो. गावोगावच्या वंशावळींची माहिती असणारे, समाजाचे इतिहासकार म्हणून ओळख असणारे हे हेळवी नेमके असतात कोण ? त्यांच्या कामाची नेमकी पद्धत काय आहे ? आणि मराठा आरक्षणाच्या सध्याच्या प्रश्नात हेळवी समाजाचं काम कसं महत्त्वाचं ठरु शकतं ? हे जाणून घेऊयात या व्हिडीओच्या माध्यमातून.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : https://www.facebook.com/BolBhiduCOM
➡️ Twitter : https://twitter.com/bolbhidu
➡️ Instagram : https://www.instagram.com/bolbhidu.com/
➡️Website: https://bolbhidu.com/