बाजींचे पुत्रच सांगतात बाजींचे काय झाले ते! कुठे,कसे धारातीर्थी पडले?
'पन्हाळ्याच्या वेढ्यातून निसटून महाराज विशाळगडावर गेले! वाटेत मधे काहीच घडले नाही! शिवरायांचा पाठलाग झालाच नाही! घोडखिंड वगैरे प्रकारच नाही! बाजी प्रभू इथे लढलेच नाहीत!' असा दावा केला जातो.
असे खरेच घडले होते का? जसा आधीपासून प्रचलित आहे तसा तो सुप्रसिद्ध प्रसंग घडलाच नव्हता का? हा एक घोटाळ्यात टाकणारा प्रश्न!
पण जेव्हा, खुद्द बाजी प्रभूंचे पुत्रच सांगतात 'त्यांचे वडील कुठे, कसे, केव्हा धारातीर्थी पडले?', तेव्हाच हे कोडे सुटते!
तीन लढायांच्या चकव्याचा उलगडा! अर्थात नेहमीप्रमाणेच पुराव्यानिशी!!