पालदुर्ग- एक बेसाऊ किल्ला
मित्रानो...
महाराष्ट्र म्हणजे गडकिल्ल्यांचा खजिना आहे..इथे अनेक वीर जन्माला आले आणि आपलं राज्य या गडकिल्ल्यांच्या मदतीने वाढवले..यात अनेक किल्ले आपले अस्तित्व टिकवत त्या अनेक शूर वीरांचे पोवाडे गात आज ही ताठ मानेने उभे आहेत, परंतु काही किल्ले मात्र काळाच्या ओघात नष्ट होऊन गेले, आणि काही बेसाऊ राहिले..यातीलच एक म्हणजे पालदुर्ग..रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यात असणारा हा किल्ला पूर्णपणे अज्ञातवासात राहून रत्नागिरी जिल्ह्यातील किल्ल्यांच्या यादीतून आपले नाव कायमचे मिटवून बसला..
खूप प्रयत्नांती एका बेसाऊ किल्ल्याचा शोध घेऊन हा प्रवास तुमच्या समोर मांडला आहे..
पालदुर्ग, तिवरेगड, भैरवगडी(नंदिवसे),कोळकेवाडी दुर्ग आणि तळसरचा किल्ला हे सर्व किल्ले शिवपूर्व काळात राबता असणारे किल्ले होते, परंतु काळाच्या ओघात दुर्लक्षित होऊन नाहीसे झाले...म्हणून जे आहेत त्यांना नवसंजीवनी देऊन त्यांचे अस्तित्व टिकवणे आपलं काम आहे.