MENU

Fun & Interesting

Pune GBS Outbreak Nanded गावातल्या विहीरीमुळे झाला का ? या विहीरीतल्या पाण्याचा नेमका विषय काय आहे ?

BolBhidu 54,045 lượt xem 2 weeks ago
Video Not Working? Fix It Now

#BolBhidu #GBSPune #GuillainBarreSyndrome

GBS अर्थात गुइलेन बॅरे सिंड्रोम. हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या लोकांसाठी हा आजार काही नवा नाही, दरवर्षी याचे काही पेशंट येतात आणि बरे सुद्धा होतात. पण यंदाचं वर्ष मात्र या गोष्टीला अपवाद ठरलंय. महाराष्ट्रात ठिकठिकाणी GBS चे पेशंट्स सापडले आहेत. पण या GBS नं कुठं थैमान घातलं असेल, तर ते आहे पुण्यात. फक्त पुण्यात महिनाभराच्या आत GBS चे १५० रुग्ण आढळले आहेत. यातल्या ५ जणांचा मृत्यू झालाय तर १८ जण व्हेंटिलेटरवर आहेत. पुण्यात ज्या ५ रुग्णांचा GBS मुळे मृत्यू झाला, त्यातले ४ जण हे पुण्याच्या सिंहगड रोड परिसरातले आहेत. सिंहगड रोडचा बहुतांश भाग GBS बाधित क्षेत्र म्हणून सुद्धा घोषित करण्यात आला आहे.

याच सिंहगड रोडवरच्या धायरी, किरकटवाडी, नांदेड आणि नांदोशी या परिसरात GBS चे अनेक रुग्ण आहेत. याच भागात रुग्णसंख्या वाढण्यासाठी नांदेड गावात असलेल्या एका विहिरीला जबाबदार धरलं जातंय. या विहिरीला राज्याच्या आरोग्यमंत्र्यांनी, स्थानिक खासदारांनी, केंद्र शासनाच्या पथकानं, आरोग्य अधिकाऱ्यांनी अशा कित्येकांनी भेटी दिल्या आहेत. पण या विहिरीचं रहस्य नेमकं आहे काय ? या भागात आणि पुण्यात GBS पसरण्यात खरंच ही विहीर कारणीभूत आहे का ? नेमकं सत्य जाणून घेऊयात या व्हिडीओमधून.


चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com

✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.

Connect With Us On🔎

➡️ Facebook : https://www.facebook.com/​BolBhiduCOM
➡️ Twitter : https://twitter.com/bolbhidu
➡️ Instagram : https://www.instagram.com/bolbhidu.com/
➡️Website: https://bolbhidu.com/

Comment