आमचा स्पेशल घरगुती मसाला - Special Gharguti Masala 😍 | आम्ही दरवर्षी असा मसाला बनवतो (Konkan) आम्ही दरवर्षी या मोसमात घरगुती मसाला बनवतो. आमचा स्पेशल घरगुती मसाला आम्ही वर्षासाठी एकदम बनवून ठेवतो. घरगुती मसाला बनवण्यासाठी आम्ही कोणत्या मिरच्या घेतो, किती आणि कोणते खडे मसाले वापरतो हे पण दाखवले आहे. आम्ही घरी छान छान रेसिपी तयार करतो त्यामध्ये आम्ही घरगुती मसाला वापरतो. आमचा घरगुती स्पेशल मसाला आहे कारण यात सर्व मासाल्यांचे प्रमाण अगदी आईच्या अंदाजाने घेतले आहेत. पारंपरिक पद्धतीने आम्ही वर्षोनुवर्षे आम्ही असाच घरगुती मसाला तयार करतो. आम्ही यावर्षी 10 किलो घरगुती मसाला बनवला. हा मसाला बनवण्याअगोदर मिरच्या आणि खडे मसाले चांगले सुकवले जातात. सुकवण्याचे सुद्धा प्रमाण असते. बेडगी मिरची, पांडि मिरची, लवंगी मिरची, कश्मिरी मिरची अशा आम्ही मिरच्या वापरल्या आहेत. आम्ही मिरच्या कुटायला आमच्या बाजूच्या रावतोली गावात गेलो होतो.
#SpecialGhargutiMasala #GhargutiMasala #KokaniMasala #sforsatish
10 किलो मसाल्यासाठी आम्ही खालीलप्रकारे साहित्य घेतले आहे.
____________________________
पांडि मिरची - 3 किलो
लवंगी मिरची - 2 किलो
बेडगी मिरची - 2 किलो
काश्मिरी मिरची - 1 किलो
स्टारफुल - 80 ग्राम
त्रिफळा - 80 ग्राम
लवंग - 50 ग्राम
हिंग खडा - 80 ग्राम
जायत्री - 40 ग्राम
मेथी - 80 ग्राम
बडीशोप - अर्धा किलो
धने - 1 किलो
काळी मिरी - 50 ग्राम
दालचिनी - 80 ग्राम
खडी/शाही वेलची - 50 ग्राम
जायपत्री/तेजपत्ता - 50 ग्राम
दगडफुल - 50 ग्राम
जिरा - 50 ग्राम
खसखस - 80 ग्राम
जायफळ - 4 पीस
आम्हाला मसाले ऑर्डर करण्यासाठी खालील Whats App नंबरवर संपर्क करा.
+91 8097266294
आमच्या घरचा स्पेशल घरगुती मसाला कसा बनवतो हे आम्ही या व्हिडीओमध्ये दाखवले आहे.
खास टीप - मसाला बनल्यावर तो टिकण्यासाठी 2 ते 4 हिंगाचे खडे त्या मसाल्यात घालावे व मसाला काचेच्या, सिरॅमिक किंवा स्टीलच्या डब्यात साठवून ठेवावा. दमट ठिकाणी मसाले कधीच ठेवू नये.
तुम्हाला हा मसाल्याचा व्हिडीओ आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका.
तुमचे प्रेम असेच कायम असुद्या !
https://www.facebook.com/koknatlamumbaikar
https://www.instagram.com/koknatlamumbaikar