निलू निरंजना… एकाच आयुष्यात अनेक आयुष्यं जगणारी ही मस्त कलंदर! अमेरिकेमध्ये कन्स्ट्रक्शन इंजिनिअरिंगसारख्या पुरुषप्रधान क्षेत्रातील तिची नोकरी. मातृभूमीचे ॠण स्मरून समाजकार्यासाठी दिलेल्या कोट्यवधी रुपयांच्या देणग्या. चोरांनी केलेला प्राणघातक हल्ला आणि त्यातूनही नव्याने उभी राहिलेली तिच्यातील लढवय्यी! एका मध्यमवर्गीय कौटुंबिक चौकटीत वाढलेली, तरीही निर्भयपणे एकटीनं जगप्रवास करणारी. कॉर्पोरेट जगाचा ताण पेलत असताना तिनं जपली सद्हृदयता आणि वर्तमानातला क्षणन्क्षण भरभरून जगण्याची रसिकता! तिचं जगणं म्हणजे ‘ओपन बुक‘ – प्रांजळ, निर्मळ, आरस्पानी. त्यांच्या या प्रवासाबद्दल जाणून घेऊ या अभिनेत्री इला भाटे, लेखिका मृणालिनी चितळे आणि स्वतः निलू निरंजना यांच्या संवादातून…