श्रीधर स्वामी चरित्र भाग १ । मकरंदबुवा सुमंत
रामदासी कीर्तन
#marathikirtan
पूर्वी शाळेच्या सहलीमध्ये काही मुले जेवणाचा डबा न घेता यायची. त्यांना जर विचारले तर सांगायची की सगळे जण दुप्पट तिप्पट इबा आणणारचं आहे. सगळ्यांना सगळा डबा काही संपवता येणार नाही मग ते अन्न वाया जाईल, असे अन्न वाया जावू नये म्हणून आम्ही असेच आलो. एखाद्या सहलीत त्यांची चंगळ होत असे पण काही वेळा पुरी फट् फजिती व्हायची. एकाला वाटले दुसऱ्याने जास्त आणले असेल ते त्यां मित्राला मिळेल. दुसऱ्याला वाटले पहिला विद्यार्थी जास्तीचे आणेल ते त्याला मिळेल. परिणामी दोघे ही थोडे-थोडेच आणतात आणि तिसऱ्याची पंचाईत होते. समाजातही असे अनेक जण असतात जे म्हणतात आम्ही कशाला चांगलं वागायला पाहिजे ? सगळं जग चांगल वागतय मी नाही चांगला वागलो तर काय बिघडणार आहे? पण असा विचार करणे चांगले नाही. जो जो विचारी मनुष्य आहे त्याने हा विचार केलाच पाहिजे की आपण जेवढे चांगले वागू तेवढा समाज चांगला होणार आहे. समाज चांगला करण्याची किल्ली माझ्यापाशीच आहे. हा विचार सांगत आहेत समर्थभक्त मकरंदबुवा रामदासी. तर ऐकुया हे रामदासी कीर्तन.
Ramdasi Kirtan
Makarand Buwa Sumant
Shridhar Swami Charitra
हा व्हिडिओ कसा वाटला. लाईक करा, कमेंट करा. व्हिडिओ सर्वांना शेअर करा.
कीर्तनविश्व चॅनेल सबस्क्राईब करा.
https://www.youtube.com/c/KirtanVishwa
कीर्तनविश्व प्रकल्पाविषयी अधिक जाणून घेण्यासाठी किंवा आर्थिक सहयोग देण्यासाठी संकेतस्थळाला भेट द्या
https://www.kirtanvishwa.org
#kirtanvishwa