#BolBhidu #ShivJayanti2023 #ChhatrapatiShivajiMaharaj
४ जानेवारीची शांत सकाळ. कुणीतरी मोगल सरदार सैन्यानिशी सुरतेजवळ ‘गणादेवी’ इथं येऊन थांबला असल्याची गोष्ट सुरतेच्या सुभेदाराला समजली. त्यावेळी सुरतेचा सुभेदार इनायतखान होता. त्याला शिवाजी महाराजांकडून निरोप मिळाला, की आपण बादशहाचे सरदार असून महाबतखानच्या आदेशावरून उत्तरेतलं बंड मोडायला निघालो आहोत. इनायातखानानं यावर उत्तर पाठवलं, “येथील लोक हा प्रचंड फौजफाटा पाहून घाबरतील. तरी आपण शहरातून न जाता बाहेरील मार्गाने जावे.” पण डच आणि इंग्रज वखारवाल्यांनी ५ जानेवारीच्या सकाळी पक्की खबर आणली होती, की ‘शिवाजीराजे’ आपल्या बारा हजार सैन्यासह सुरतेवर चाल करून येत आहेत. शहरात एकच पळापळ सुरू झाली. व्यापार्यांनी दुकानं बंद करून घरं गाठली, शहराच्या सीमेवर राहणार्यांनी तर शहर सोडून भीतीनं पोबारा केला आणि याच दरम्यान मराठा सैन्य भिडलं त्याकाळच्या जगातल्या सगळ्यात श्रीमंत माणसाला. यावेळी नेमकं काय घडलं ? हा श्रीमंत माणूस होता तरी कोण ? तेच या व्हिडीओमधून पाहुयात.
Subscribe to BolBhidu here: http://bit.ly/SubscribeBolbhidu.com
Connect With Us On:
→ Facebook: https://www.facebook.com/BolBhiduCOM
→ Twitter: https://twitter.com/bolbhidu
→ Instagram: https://www.instagram.com/bolbhidu.com/
→ Website: https://bolbhidu.com/