५ मिनिटात होणारी बटाट्याची बैठी भाजी/ उपासला चालणारी/first time on youtube/Unique fasting recipe
आज आपण बघूया उपासची बैठी भाजी बटाटे उकडलेले असतील तर ही भाजी अक्षरशः ५ मिनिटात होते
पौष्टिक आणि चविष्ठ वमिस चे पहिले male cook मिलिंद दातार यांनी सहज केलेली ही भाजी करून पहा आणि २ मिनिटात फस्त करा
साहित्य -
५ ते ६ उकडलेले बटाटे
१ छोटी वाटी दाण्याचं कूट
१ छोटी वाटी ओलं खोबरं
१ छोटी वाटी कोथिंबीर
१ चमचा जिरं पूड
अर्ध्या लिंबाचा रस
चवीनुसार मीठ
१ चमचा साखर
यातलं साहित्य तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता
उकडलेल्या बटाट्याच्या आवडतील तशा फोडी करून घ्यायच्या किंवा हाताने कुस्करून घ्यायचा त्यात वरील सगळं साहित्य घालून मिश्रण नीट एकजीव करून घ्यायचं खायला घेताना परत वर खोबरं कोथिंबीर घालून द्यायची
ही भाजी उपासला चालते आणि अगदी ५ मिनिटात तयार होते बटाट्यातले पौष्टिक घटक यात कायम राहतात कारण बटाटे फक्त उकडून घेतलेले आहेत तेलात परतलेले किंवा तळलेले नाहीत. ही भाजी लहानांपासून ते मोठ्यां पर्यन्त कोणालाही करता येते Please subscribe to VMi's Khadyayatra
#potatorecipe
#upavasrecipe
#quickrecipe
#batata
#easycooking
#zerooilcooking
#healthyfood
#boiledpotato
#malechef
#simplerecipe