ग्रेव्ही एक भाज्या अनेक l Gravy 1 Many Vegetables
साहित्य
दोन कांदे
तीन टोमॅटो
थोडेसे काजू
लसूण पाकळ्या
कोथंबीर
कृती
कांदे मोठ्या आकारांमध्ये कट करून टोमॅटोला चिरा पाडून टोमॅटो, काजू, कांदा, मंद आचेवरती टोमॅटोची साल वेगळे होईपर्यंत शिजवून घेऊन थंड झाले की मिक्सरच्या भांड्यामध्ये कांदा, टोमॅटो, काजू, लसूण, कोथिंबीर यांचे वाटण तयार करून घ्यायचे व गॅस वरती कढई ठेवून कढईमध्ये दोन चार चमचे तेल टाकून तेल गरम झाले की त्यामध्ये दालचिनीचा तुकडा तेजपत्ता कांदा लसूण मसाला,गरम मसाला, लाल तिखट, धने पावडर, हळद असे आपल्याला हवे तेवढे मसाले टाकून परतून घेऊन मिक्सरला वाटलेलं वाटण त्यामध्ये मिक्स करून मंद आचेवरती आठ दहा मिनिट शिजवून ग्रेव्ही तयार करून घ्यायची तयार आहे ग्रेव्ही
टीप : ग्रेव्ही तयार करून घेताना मीठ वापरायची गरज नाही.
अशाच साध्या व सोप्या रेसिपीसाठी आमच्या खालील दिलेल्या लिंक वर क्लिक करून रुचकर सुप या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबायला विसरू नका..
https://youtube.com/@RUCHKARSOUP?si=W20pmLX9BZBsDQ8f