#BolBhidu #LokSabha2024 #SharadPawar
राजकारणात सामान्य माणसाला काय मिळतं ? उमेदवाराला तिकीट, पत्रकाराला पाकीट आणि जनतेला ? कुणाच्या तरी विजयात आपला आनंद शोधत दिवस घालवते जनता. निवडणुकीत पक्षाला जागा मिळते आणि सामान्य माणसाला त्याची जागा कळते. यापेक्षा फार वेगळे अनुभव येत नाहीत. आपण सगळेच कधीतरी खूप खचतो. निराश होतो. जगात कुणीच आपलं नाही असं वाटू लागतं. आपण हतबल होऊन बसतो. अशावेळी आपल्याला कुणीतरी अध्यात्मिक गुरु लागतो. देव लागतो किंवा कुणीतरी मार्गदर्शक लागतो. आपण आजारी असलो किंवा आपण निराश असलो की आपल्याला कुणाचातरी खांदा लागतो.
पण एक माणूस असा आहे, जो आजारी असो, निराश असो किंवा त्याचा पराभव झालेला असो. तो नेहमीच लोकांसाठी खांदा असतो. तो नेहमीच कुणासाठी तरी आधार असतो. तो नेहमीच कुणासाठी तरी प्रेरणा असतो. गेल्या काही वर्षात तो माणूस निवडणुकीत उभा नसतो. पण लोक त्याच्या भरवशावर उभे असतात. तो माणूस म्हणजे शरद पवार. निवडणुका झाल्या, निकाल लागले, पण शरद पवारांनी राजकारणाच्या पलीकडे सामान्य माणूस म्हणून नेमकं काय शिकवलं ? शरद पवारांकडून राजकारणापलीकडे काय शिकलं पाहिजे ? याचंच उत्तर देणारा हा व्हिडिओ.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : https://www.facebook.com/BolBhiduCOM
➡️ Twitter : https://twitter.com/bolbhidu
➡️ Instagram : https://www.instagram.com/bolbhidu.com/
➡️Website: https://bolbhidu.com/